google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

गेल्या तीन दिवसांत चांदी 1500 रुपयांहून वधारली…

author
0 minutes, 2 seconds Read

या आठवड्यात सोने आणि चांदीने दरवाढीची नांदी दिली. जून महिन्यात दोन्ही धातूच्या आघाडीवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. तर जुलै महिन्यात चांदीने दरवाढीचे घौडे दामटले आहे. तर सोन्यात चढउताराचे सत्र सुरु आहे. दोन दिवसात सोन्याने दरवाढीत आघाडी घेतल्यानंतर कालपासून विश्रांती घेतली आहे. आजही सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत दिसत आहेत. अर्थात दुपारनंतर चित्र वेगळेपण असू शकते. बजेट 2024 पूर्वी सोने आणि चांदीकडे पण ग्राहकांचे लक्ष आहे. सध्या अशा आहेत मौल्यवान धातूच्या किंमती

सोन्यात चढउताराचे सत्र

गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने उसळी घेतली होती. 2 जुलै रोजी सोने 110 रुपयांनी वधारले होते. तर 3 जून रोजी भावत कोणताच बदल दिसला नाही. आज सकाळी घसरणीचे संकेत दिसत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची दमदार चाल

गेल्या आठवड्यात चांदीचा भाव सुस्तावला होता. चांदीला चमक दाखविता आली नाही. जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांदीने दमदार घौडदौड केली आहे. 1 जुलै रोजी चांदी 200 तर 2 जुलै रोजी 800 रुपयांनी आणि 3 जुलै रोजी चांदी 500 रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारले. 24 कॅरेट सोने 72,226 रुपये, 23 कॅरेट 71,937 रुपये, 22 कॅरेट सोने 66,159 रुपये झाले. 18 कॅरेट 54,170 रुपये, 14 कॅरेट सोने 42,252 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 89,698 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *