google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

सावधान! राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय

author
0 minutes, 0 seconds Read

राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांना पावसासाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय. ते जिल्हे नेमके कोणते आहेत, हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. आज कोकण आणि घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह आ़ज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा?

रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पुणे या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट आज हवामान विभागाने दिला आहे. तर नागपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा येलो अलर्ट आयएमडीने दिवा आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ३ जूलैपर्यंत सकाळच्या २४ तासांमध्ये पावसाचा जोर जास्त होता. कोल्हापुरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. आजरा येथे १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळत आहे. राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचं चित्र आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *