पत्नीच्या विवाहबाह्य संबंधात पती ठरला अडसर; पतीचा मावसभाऊ असलेल्या प्रियकराकडून निर्घृण खून

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक: पती अडसर ठरत असल्याने विवाहबाह्य संबंधात गुंतलेल्या पत्नीने पतीचा मावसभाऊ असलेल्या प्रियकराकरवी पतीचा खून घडविल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. इंदिरानगर पोलिसांच्या हद्दीतील कचरा डेपो जवळील निर्जन भागात योगेश बत्तासे (वय ३२, रा. नांदगाव) याचा दगडाने डोक्यात मारून निर्घृण खून करण्यात आला होता.

या प्रकरणात संशयित पत्नी कोमल बत्तासे व तिचा प्रियकर कृष्णा गोराणे या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांमध्ये काही महिन्यांपासून विवाहबाह्य संबंध होते. योगेशने या संबंधाबाबत पत्नीला समज दिल्यानंतर संतापून दोघांनी मिळून खून करण्याचा कट रचला. शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता कृष्णाने योगेशला बाहेर बोलावून घेतले. मद्यपानानंतर योगेशच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला.

पोलिसांनी काही तासांतच या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427