नाशिक :- नाशिक येथे सकल मराठा समाजातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फनाशिक येथे सकल मराठा समाजातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी 1000 बेडचे अत्याधुनिक वसतिगृह आणि सारथी शिक्षण संस्थेचे विभागीय कार्यालय बांधण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून भूमिपूजन केले. याप्रसंगी मराठा समाजाने दोन्ही नेत्यांचे आभार मानले.
या भूमिपूजनाचा कार्यक्रम नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोरील दूध डेरीच्या जागेवर पार पडला.इमारत छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या सारथी विभागीय कार्यालयासाठी उभारली जाणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे,आमदार देवयानी फरांडे,आमदार राहुल ढिकले,आमदार सीमा हिरे,मराठा समाज नेते सुनील भाऊ बागुल,माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे,उद्धव निमसे,शिवाजी गांगुर्डे, अनिल भालेराव,तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी कोणशिला अनावरणही करण्यात आले.
त्र्यंबक नाका येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर 500 विद्यार्थ्यांसाठी व 156 कोटी रुपये खर्चाच्या 10 मजली इमारतीत सारथी संस्थेचे वसतिगृह आणि विभागीय कार्यालय उभारण्यात येणार आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नांमुळे जागा आणि निधी उपलब्ध झाला असून,ही इमारत मराठा समाजाच्या दीर्घकालीन मागणीनुसार उभी राहणार आहे.माजी खासदार हेमंत गोडसे यांचाही या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न होता,त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधींचे सकल मराठा समाजाने आभार मानले.
मराठा समाजाने आज ज्या पद्धतीने वस्तीग्रह निधी दिल्यानंतर समाधान व्यक्त करत आभार व सत्कार केला, त्याचप्रमाणे ओबीसी मधून मराठा आरक्षण देत इतर मागण्या पूर्ण करून न्याय द्यावा,अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांची सन्मान चिन्ह आणि राजमुद्रा भेट देत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा यापेक्षाही मोठे स्वागत व आनंदोत्सव नाशिक जिल्ह्यात साजरा करू असे सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना सांगून आभार व्यक्त केले.
या प्रसंगी सकल मराठा समाजाच्या वतीने सुनील भाऊ बागुल,करण गायकर,नानासाहेब बच्छाव,चेतन शेलार,आशिष हिरे,व्यंकटेश मोरे,प्रफुल वाघ,विजय वाहुळे, हिरामण नाना वाघ नितीन काळे,सचिन पवार,वैभव दळवी,राम निकम,ह भ प श्रीमंत महाराज बागल,योगेश गांगुर्डे भारत पिंगळे,देवकर सर,अनिल आहेर,विक्रम गायधनी, विकास रसाळ,शिवम देशमुख यश बच्छाव,निलेश शेलार,सुनील देशमुख ,गणेश जाधव पाटील,सचिन देवगिरे,महेंद्र दळवी,अतुल विसे मनोज लाड श्रीकांत इशे गणेश वाजे गौरव गाजरे,मनोरमा पाटील संगीता सूर्यवंशी सविता वाघ रेखा पाटील काजल देवरे यांच्यासह सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता