महाराष्ट्र विधानसभा :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -2024 मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून, सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील 61.1% वरुन यावेळी अंदाजे 66% पर्यंत मतदानाचे प्रमाण पोहोचले आहे. (पोस्टल मतांचा समावेश वगळता). मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील भारत निवडणूक आयोगाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियांचे सखोल विश्लेषण करण्यात आलेले आहे. यानुसार अनेक उपक्रम […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला आघाडीचा कौल मिळाल्याचे दिसत असले तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंतून सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचा निर्धार महाविकास आघाडीने बहुमत मिळाल्यास २६ नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा ठराव करण्यात […]
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागांचे स्पष्ट बहुमत मिळेल आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. महाविकास आघाडीचा विश्वास संजय राऊत म्हणाले की, “राज्यभरात ६५% हून अधिक मतदानाची […]
नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) सरासरी ६९.१२% मतदानाची नोंद झाली. काही किरकोळ वाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडले. शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. मतदानाचा शेवटचा टप्पा पार झाल्यानंतरही काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. प्रमुख विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी महत्त्वाचे मुद्दे व […]
मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असून मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. आज जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांना भेट देऊन तेथील सोयी सुविधांचा […]
नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण 46% मतदानाची नोंद झाली आहे. काही महत्त्वाचे आकडे असे आहेत: सर्वाधिक मतदान दिंडोरी (59%) येथे झाले असून, बागलाण (39%) येथे सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.
नाशिक :- सकल मराठा समाजाने नाशिक येथे झालेल्या बैठकीत एकमुखी निर्णय घेतला की, समाजाचा कोणत्याही गटाला किंवा उमेदवाराला ठरलेला पाठिंबा नाही. समाज सर्वसमावेशक आणि एकसंध आहे. त्यामुळे प्रत्येकाला समाजाच्या हिताचा उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, असे स्पष्ट करण्यात आले. सकल मराठा समाजाचे नेते नाना बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काल-परवा काही गटांनी व्यक्त केलेल्या पाठिंब्याला […]
येवला तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाने आगामी विधानसभा निवडणुकीत Adv. माणिकराव शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. महासंघाचे जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी यांनी स्पष्ट केले की, छगन भुजबळ यांच्या ओबीसी मराठावाद वाढविणाऱ्या भूमिकेला विरोध करत येवला तालुक्यातील समग्र मराठा समाज एकत्र येऊन शिंदे यांना पाठींबा देत आहे. समाजासाठी योगदान:माणिकराव शिंदे यांचे समाजाभिमुख कार्य, शैक्षणिक […]
विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत. किती तरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ तर काही उमेदवारांची ही दुसरी, तिसरी, चौथी वेळ असणार आहे. […]
यवतमाळ : मतदार जनजागृतीसाठी यवतमाळ विधानसभा मतदासंघाच्यावतीने विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी तयार करून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील एक हजार ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले होते. यवतमाळचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकूल येथे करण्यात आले होते. यावेळी यवतमाळ व […]