google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

पुढचे पाऊल पुस्तकाचे प्रकाशन सोहळा नाशिक शहरात मोठ्या उत्साह संपन्न

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक वृत्त

नाशिक:- आज दिनांक 23 3.२४ रोजी सकाळी११वाअखिल भारतीय मराठा महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेले *पुढचं पाऊल* ह्या पुस्तकाचे प्रकाशन नाशिक येथील आय एम आर टी हॉलच्या सभागृहात पार पाडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी डायरेक्टर आय एम आर टी कॉलेज डॉक्टर भाऊसाहेब मोरे प्राध्यापक अशोक राव सोनवणे ज्येष्ठ पत्रकार श्री विक्रांत मते ,प्राचार्य श्रुती देशमुख, उद्योजक श्री योगेश पाटील गडाख यांच्या उपस्थितीत व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोद जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय कोषा अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पाडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत बनकर यांनी करताना आज कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करून तसेच भगतसिंग , शहीद राजगुरू सुखदेव सिंग यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यांनी प्रास्ताविक करताना पुढचं पाऊल या पुस्तकाची संकल्पना व पुस्तकाची माहिती आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकातील ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिककतचा ध्यास, व त्याचा उपयोग याविषयी माहिती दिलीप्रमुख पाहुण्यांमध्ये डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी यांनी सद्य काळातील मराठा समाजाच्या विवाह सोहळा बाबत चाललेला अतिरिक्त खर्च व त्यावर आवर कसा घातला गेला पाहिजे त्यासाठी समाजाने काय केले पाहिजे.

तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव तंत्ज्ञानविषयकसोबत शिक्षणाची आवश्यकताआहे. समाजाने काळानुरूप बदलले गेले पाहिजे याविषयी माहिती दिली तसेच प्राध्यापक अशोक सोनवणे प्राचार्य श्रृती देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात श्री प्रमोद जाधव यांनी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची माहिती देऊन अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्य व पद्धती तसेच पुढचे पाऊल या पुस्तकाबाबत सविस्तर माहिती सांगितली.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक अध्यक्ष वेंकटेश मोरे, नाना बच्छाव , अविनाश वाळुंजे,अमोल निकम, (मालेगाव) योगेश नाटकर रमेश खापरे राजेंद्र शेळके, सुभाष शेळके गिरीश आहिरे, विष्णू अहिरे, सूर्यकांत आहेर, संदीप बऱ्हे, राम निकम, ओंकार दुगजे अस्मिता ताई देशमाने शोभाताई सोनवणे स्वातीताई जाधव प्रमिलाताई रोहिणी ताई उखाडे , असे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समीर वडजे उत्तर महाराष्ट्र प्रशासन विभाग प्रमुख यांनी केले

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *