google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

राजकारणाचे शालजोडे बाहेर ठेवून समाजासाठी योगदान द्या…

author
0 minutes, 0 seconds Read

गिरणारे येथील मराठा आरक्षण आंदोलन नियोजन बैठकीत नाना बच्छाव यांचे मार्गदर्शन,

नाशिक :- मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा महादिंडीत
सामील होण्यासाठी, तसेच नाशिककरांचे याकामी नियोजनार्थ
गिरणारे ता. नाशिक येथील लक्ष्मी लॉन्स मध्ये बैठक झाली, या बैठकीत उपस्थितांसमोर बोलतांना नाशिकच्या मराठा आरक्षण लढ्यातील मुख्य मराठा उपोषणकर्ता नाना बच्छाव यांनी मराठा आरक्षणाच्या या अंतिम संघर्षात जो राजकारणाचे शाल जोडे बाहेर काढून आंदोलनात सहभागी होईल, तोच मराठ्यांचा असेल,
हे ध्यानात ठेवा,आधी समाज व समाजाचे आंदोलन मगच संधी मिळेल अन्यथा समाज उभा ही करणार नाही, त्यासाठी मराठा समाजाने एकजूट दाखवा,मुंबईत जाण्यासाठी नाशिक वतीने आपल्याला “एक कुटुंब एक तांदूळ कट्टा, (goni), किंवा तेल डबा, असे योगदान द्यावे जेणेकरून आंदोलन कर्त्यांना आपण अन्न सेवा देऊ शकू त्यासाठी नियोजन करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले,

तत्पूर्वी करण गायकर यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाने योगदान द्या,मराठ्यांचे क्रांतियोद्धे दिवंगत अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे पाटील यांचे नंतर मनोज जरांगे पाटील सारखे त्यागी स्वच्छ प्रतिमेचा अभ्यासु नेतृत्व स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून आपल्या समाजाच्या वेदना घेऊन आरक्षणासाठी लढत आहे, आपण त्यांचे सोबत रहा, यावेळी शिवाजी सहाणे यांनी सांगितले की जो सक्षम असेल त्यांनी मराठा समाजासाठी योगदान दिल पाहिजे,त्यासाठी तत्पर राहा,मराठा समाजाचा हा निर्वांनीचा लढा अंतिम लढा आहे त्यासाठी आतां त्यागाने पुढे या, मुंबईतील आंदोलनाचा आवाज बना, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, यासाठी गाफिल सरकार वर विश्वास नको, आता मराठा सागरासारखा उसळला पाहिजे,यावेळी महंत चक्रपानी बाबा यांनी मनोज जरांगे पाटील हा युवक गरीब कुटुंबातील आहे, मात्र आंदोलन चळवळ हा त्याचा पिंड आहे, आपला समाज अडचणीत असताना, समाजात शेतकरी व बेरोजगार आत्महत्या करतो हे बघून डोळे पन्हावलेला मराठ्यांचा हा क्रांतिसूर्य मोठी शक्ती आहे, त्याला साथ द्या,यावेळी अनिल थेटे, तानाजी गायकर,प्रकाश धोंडगे,नितीन गायकर यांनी स्थानिक नियोजनावर मांडणी केली तर पुंडलिकरावं थेटे यांनी मराठा समाज गेल्या अनेक वर्षे आरक्षण मागतोय मात्र निष्क्रिय व्यवस्था मात्र सत्तेपोटी लाचार बनलीत समाज ते विसरले, ज्या समाजाला कित्येक वर्षे केवळ लढावं लागलं, त्यांना आतां मनोज जरांगे पाटील सारखा सच्चा नेता लाभला, ज्याने घरदारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःची जमीन विकून मराठा लढा उभारला,त्यांना सर्वांनी साथ द्या, आम्ही वारकरी सगळे मराठा आरक्षणासाठी अगोदर पासून सोबत आहोत असणार असे सांगितले, यावेळी हभप कृष्णा महाराज धोंडगे यांनी सांगितले की समाजासाठी बाहेर या प्रत्येकाने मनोज जरांगे पाटील यांच्या त्यागातून उभा राहिलेला आपल्या हक्काचा आरक्षणाचा लढा हाती घ्या, सहभागी व्हा,बाळासाहेब लांबे, प्रकाश धोंडगे यांनी यावेळी मार्गदर्शन केले,व योगदान देण्याबाबत नियोजनात सहभाग घेतला,यावेळी गिरणारे परिसरातील अनेक मराठा बांधव यावेळी उपस्थित होते,

यावेळी गिरणारे येथील 11 सदस्य स्थानिक समिती स्थापन करून आजूबाजूचे गाव त्यात जोडली आहेत, धान्य तेल हे लक्ष्मी लॉन्स ला द्यावे असे नियोजन यावेळी झाल्याचे अनिल थेटे यांनी सांगितले,
यावेळी सूत्रसंचालन राम खुर्दळ यांनी तर आभार पुंडलिक थेटे यांनी मांडले,
यावेळी दरम्यान दि 24
रोजी सकाळी 9,00 वाजता शिवतीर्थावर जमायचे,यावेळी आपला लावजमा, धान्य साहित्य सोबत ठेवा,मोटारसायकल रेलीत भगवा ध्वज, व शिस्त ठेवा,सहभागी मंडळींनी थंडीत कपडे, अंगात स्वेटर कान टोपी सोबत ठेवा, स्वतःची काळजी घ्या, समाज सोबत असेल,आपण
नाशिक -पुणे मार्गे मुंबईत जाण्यासाठी
नियोजन आखले आहे, त्यानुसार निघा, असे ही यावेळी जाहीर केले,

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *