गिरणारे हायस्कुल विज्ञान प्रदर्शनात आदिवासी गटात प्रथम,

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- के .बी एच. हायस्कूलचा विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यात उच्च प्राथमिक आदिवासी गटात प्रथम क्रमांक, राज्यस्तरासाठी निवड झाली, नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंजनेरी, तालुका त्र्यंबकेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने ५१ वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ३ ते ५ जानेवारी २०२४ ला आयोजित करण्यात आले होते. सदर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या के.बी.एच.हायस्कूलच्या इयत्ता ७ वी ब च्या सत्यम वाकसरे व दर्शन थेट

या दोघांनी फायर फायटिंग रोबोट तयार केला होता त्यांच्या या उपकरणास जिल्हास्तरावर उच्च प्राथमिक आदिवासी गटात प्रथम क्रमांक मिळाला ,सत्यम व दर्शन यांना विद्यालयातील उपशिक्षिका श्रीम. देवरे एच .पी. त्याचप्रमाणे सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले , विजेत्यांचे मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सरचिटणीस अॅड नितीन( भाऊ) ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, सभापती बाळासाहेब क्षिरसागर ,उपसभापती देवराम मोगल, नाशिक शहर तालुका संचालक लक्ष्मणराव लांडगे, नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश आबा पिंगळे व सर्व संचालक मंडळ , मविप्र.संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.डॉ.भास्कर ढोके, शालेय समितीचे सर्व सदस्य, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्या. बस्ते यू डी , उपमुख्या. सौ वाघ एस. ए. मविप्र समाज संस्थेचे सेवक संचालक तथा विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री शिंदे सी डी , सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *