मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणाला सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यात जनजागृती दौरा….

author
0 minutes, 0 seconds Read

मुंबई आंदोलनासाठी इगतपुरी, सिन्नर त्र्यंबकला मराठा समाजाच्या झाल्या बैठका

नाशिक :- मुंबई येथे श्री मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणाला सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यात जनजागृती दौरा दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी सुरू करण्यात आलेला असून नाशिक येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून नाशिक येथील सकल मराठा समाजाच्या वतीने नाना बच्छाव, चंद्रकांत बनकर, शिवाजी सहाणे, करण गायकर श्री. विष्णुपंत घुगे, वैभव दळवी, शरद लोणकर,कैलास खांडबहाले, योगेश नाटकर,विकी देशमुख,निलेश ठुबे, हर्षल पवार, ज्ञानेश्वर कवडे, ज्ञानेश्वर सुरासे यांनी मानवंदना करून सकाळी 11 वाजता त्र्यंबकेश्वर दुपारी तीन वाजता इगतपुरी व संध्याकाळी सहा वाजता सिन्नर येथे मराठा समाजातील समाज बांधवांचे बैठका घेतल्या बैठकीमध्ये दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी मुंबईला आंदोलनामध्ये सहभाग होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून जे मराठा बांधव आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहे त्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यातून धान्य तांदूळ तेल शेंगदाणे डाळ व सर्व भोजन व्यवस्थेसाठी लागणारे सामग्री समाज बांधवांनी आपापल्या तालुक्यातील गण गट व तालुक्याच्या ठिकाणी जमा करावे त्याचप्रमाणे समाजातील दानशूर व्यक्ती आर्थिक मदत करणार असतील त्यांनी सकल मराठा समाजाच्या नावाने काढण्यात येणाऱ्या क्यू आर कोडवर ऑनलाइन करावे असे आवाहन करण्यात आले असून मागील आंदोलनाचा इतिहास पाहता मराठ्यांनी हे आंदोलन अत्यंत शिस्तप्रिय व शांततेने मुंबईला कोटींच्या संख्येने जमायचे आहे व मुंबई जाम करायचे आहे असे आवाहन समाज बांधवांना त्रंबकेश्वर इगतपुरी व सिन्नर येथे करण्यात आले तसेच यापुढे ही जिल्ह्यातील इतर तालुके मध्ये नियोजनात ठरल्याप्रमाणे बैठका होतील व समाज बांधवांना अशाच प्रकारे आवाहन करण्यात येईल सदरची लढाई ही शेवटची निकाराची आहे व पुढील पिढीसाठी फायदेशीर असल्याने प्रत्येक घरातील समाज बांधवांनी मुंबई येथे जाण्यासाठी सज्ज राहावे..
त्रंबकेश्वर येथील बैठकीत असलेले समाज बांधव रवींद्र वारुंगसे, बाळासाहेब वारुंगसे, संतोष मेढे, पुरुषोत्तम कडलक, नवनाथ कोठुळे, ज्ञानेश्वर महाले, शिवाजी कसबे, रंगनाथ भिंदे, राज चव्हाण आधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईगतपुरी येथील बैठकीत भाऊसाहेब कडभाने, रवींद्र गव्हाणे, तुकाराम सहाणे, नामदेव शिंदे, संदीप बरे, विजय जाधव, प्रताप जाधव, मनोज सहाणे तसेच सिन्नर येथील तालुक्याच्या बैठकीत विलास पांगारकर, विठ्ठल राजे उगले, ज्ञानेश्वर ढोली, प्राध्यापक राजाराम मुंगसे, पप्पू गोडसे, स्वप्निल डुंबरे, प्राध्यापक सचिन उगले, दत्ताजी वायचळे, रवींद्र मोगल, कॉम्रेड हरिभाऊ तांबे, दत्ता हरळे, अण्णासाहेब खाडे, अमोल देशमुख, मिलिंद गायकवाड, पांगारकर वैभव आदित्य उगले, वामनराव गाडे, राजेंद्र चव्हाण के इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित समाज बांधवांनी आपापल्या तालुक्यात जिल्हा कमिटीने सांगितल्याप्रमाणे नियोजन करण्याचे ठरवले असून जास्तीत जास्त संख्येने मुंबई येथे वाहने घेऊन रसत पुरवठा करू असे आश्वासन दिले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *