google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

सुधाकर बडगुजर यांना नाशिक मध्ये काही भयानक घडवायचे आहे का ?

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक वृत्त :- आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई बॉम्बस्फोटात शिक्षा झालेल्या सलीम शेख सोबत उबाठाचे सुधाकर बडगुजर नाचत असल्याचा व्हिडीओ धक्कादायक आहे. सुधाकर बडगुजर यांना नाशिक मध्ये काही भयानक घडवायचे आहे का ? याची चौकशी झालीच पाहिजे. बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराशी बंधुत्व, हेच आहे का उबाठाचे हिंदुत्व ? असा सवाल शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी केला आहे.

१२ मार्च १९९३ ला मुंबईत १२ ब्लास्ट झाले होते. संपुर्ण देशाला हादरुन देणारा हा दिवस होता. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट म्हणावा लागेल. या हल्लात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर ७०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही अंगावर काटा आणतात. या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा खास शूटर सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याला ही कटात सहभागी असल्याने न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. या सलीम शेख सोबत उबाठा गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे ‘मैं हूं डॉन’ या गाण्यावर डान्स करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संजय राऊतची पिपाणी, देशद्रोह्यांसोबत गातो गाणी. मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून दहशत माजविणाऱ्या देशद्रोह्याचे पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देतांनाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. बडगुजर यांची तातडीने चौकशी व्हावी, त्यांनी काय भेट दिले? नाशिक मध्ये काही मोठे घडवायचे नियोजन आहे का? याची चौकशी झालीच पाहिजे. २५७ निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्यांचे, शिवसेना भवन उडविण्याचा कट रचणाऱ्याचे स्वागत सुधाकर बडगुजर का करत होते? त्याच्या सोबत नाचतात. हेच यांचे बेगडी हिंदुत्व आहे का? बडगुजर यांना नाशिकचे डॉन व्हायचे आहे का? ही पार्टी कुठे झाली? नाशिककरांना या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *