स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे मंगलोर, कर्नाटक येथे आयोजित ७७व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नाशिकच्या अदिती हेगडेने राज्याचे प्रतिनिधीत्व करताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अदितीने ४ बाय १०० मीटर मिक्स फ्री स्टाइल रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावले, तर १०० मीटर आणि २०० मीटर फ्री स्टाइलसह चार बाय २००, चार बाय १०० मिडले, आणि चार बाय १०० मिक्स मिडले रिले प्रकारात चार रौप्य पदके मिळवली.
अदिती हेगडे नाशिक येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर सराव करते. तिच्या यशामध्ये प्रशिक्षक शंकर मादगुंडी आणि विकास भडांगे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. व्यवस्थापिका माया जगताप मॅडमच्या सहकार्याने अदितीने आपले कौशल्य अधिक विकसित केले आहे. तिच्या यशावर संपूर्ण पालक वर्गाने तिचे भरभरून कौतुक केले आहे.
अदितीचे हे यश नाशिकसाठी अभिमानास्पद ठरले आहे, ज्यामुळे तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.