राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून नाशिक जिल्ह्यात विविध मतदारसंघात चुरशीच्या लढतीची स्थिती स्पष्ट होत आहे. सकाळी ८ वाजेपासून सुरु झालेल्या मतमोजणीमध्ये नाशिक जिल्ह्यातील प्रमुख मतदारसंघांतील आकडेवारी हाती आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख मतदारसंघांची स्थिती
- नाशिक पूर्व: राहुल ढिकले (भाजप) आघाडीवर
- सिन्नर: माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी – अजित पवार गट) सहाव्या फेरी अखेर ६,७०० मतांनी आघाडीवर
- मालेगाव बाह्य: दादा भुसे (शिवसेना – शिंदे गट) चौथ्या फेरी अखेर १७,४९० मतांनी आघाडीवर
- बागलाण: दिलीप बोरसे (भाजप) पहिल्या फेरी अखेर १०,६८६ मतांनी आघाडीवर
- चांदव: डॉ. राहुल आहेर (भाजप) ५,३१३ मतांनी आघाडीवर
- निफाड: दिलीप बनकर (अजित पवार गट) चौथ्या फेरी अखेर १३,१७७ मतांनी आघाडीवर
- दिंडोरी: ७,४९९ मतांनी आघाडीवर
- इगतपुरी: हिरामण खोसकर ३९,५५४ मतांनी आघाडीवर
- कळवण: जीवा पांडू गवित दुसऱ्या फेरी अखेर ९९ मतांनी आघाडीवर
- दिनकर पाटील (भाजप): ५,३०६ मते, सुधाकर बडगुजर (शिवसेना – ठाकरे गट) १,५३२ मते, सीमा हिरे (भाजप) ३,४७९ मते
- देवळाली: अहिरराव २,९८६ मते, सरोज अहिरे ४,७७४ मते, योगेश घोलप १,७८७ मते
राज्यभरात आघाडी घेतलेल्या उमेदवारांमध्ये भाजप, शिवसेना – शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या गटांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. पुढील फेऱ्यांमध्ये निकाल अधिक स्पष्ट होतील.