मुंबई: ऐन सणासुदीच्या काळात, गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विविध प्रलंबित मागण्या मान्य न केल्याच्या निषेधार्थ एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला असून, राज्यभरातील एसटी बस डेपो बंद असल्यामुळे प्रवासी ठप्प झाले आहेत. एसटी कर्मचारी संघटनांनी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, यासह आर्थिक बाबी […]
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ताज्या बैठकीत, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील सुमारे 1,000 गावांना थेट फायदा होणार आहे. मनमाड ते इंदूर या 309 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर 30 नवीन स्थानकांचे निर्माण होईल. उद्योगक्षेत्राला प्रोत्साहन हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट […]
नागपूर : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात दिली. रेशीमबाग […]