google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक मेनरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंगल कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- नाशिक मेनरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंगल कार्यालय येथे कार्यालय आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर आणि रमेश काका भोसले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी अविनाश वाळुंजे, चंद्रकांत बनकर, राजेंद्र शेळके, मदन शिरसाठ, नानासाहेब बच्छाव, गौरव गाजरे, राजेंद्र देवकर, विलास गडाख, सागर कातड, संदीप ब-हे यांनी मनोगत मांडले.
राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती वर्णन करण्यात आली.


महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात, छळविरोधात कायदा करणारे छत्रपती शाहू महाराज, अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा, आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपये दंड ठोठावणारा राजा, कला, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा असे छत्रपती शाहू महाराजांविषयी गौरवोद्गार काढले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा, वसतिगृह निर्माण करणारा राजा, बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले. त्यांनी सोनतळी येथे भटक्या विमुक्त जातीच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली. समाजातील सर्व घटकांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून त्यांनी शाळा, दवाखाने, पानवटे, विहिरी, सार्वजनिक इमारती सर्वांसाठी खुल्या केल्या. यावेळी उपस्थितांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले.
यावेळी रमेशकाका भोसले, रमेश खापरे, विलास जाधव दीपक थोरात, अनिल आहेर, बारकू आण्णा कोशिरे, योगेश पाटील, रमेश खापरे, प्रल्हाद जाधव, प्रितेश रायते, त्रिलोक भामरे, पुंडलिक घुले आदींसह सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वाळुंजे यांनी केले आणि आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर सुरासे यांनी मानले

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *