google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान…

author
0 minutes, 1 second Read

मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यापासून मी किंवा सरकार मागे गेलेलो नाही. राज्यातली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे मुंबईत आज संध्याकाळपर्यंत तरी किमान किंवा दोन-तीन दिवस सुद्धा पदवीधर निवडणुकांमुळे आचारसंहिता आहे. हा निकालानंतर ही आचारसंहिता संपेल. मग याबाबत मुंबईमध्ये बसून निर्णय घेतला जाईल. आचारसंहितेमुळे निर्णय घेता येत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा अनेक योजना आगामी काळात येतील, असं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

पुण्यातील काही पब आणि बारमध्ये ड्रग्जचं सेवन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. पब, बारची झाडाझडती सुरू केली आहे. खूप विचारपूर्वक आवाहन करतो. प्रमाण वाढले, चिंता वाढली नक्की पण 70 लाख जनतेचं शहर गेलं कामातून अश्या प्रकारची प्रतिमा तयार होत आहे. याचा पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. सगळ्यात चांगले शिक्षण संस्था पुण्यात आहे. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. अशा घटना घडणं योग्य नाही, असं चंद्रकात पाटील म्हणाले.

इंडस्ट्री, वैद्यकीय सुविधा इथे जास्त आहे. प्रचंड विकसित होणाऱ्या जगामध्ये नावारूपाला येणाऱ्या देशातील 8 व मोठ शहर भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मानला जातो. व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेलं शहर अस प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे. प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, घटना घडल्यावर किंवा तात्पुरती कारवाई न करता. दक्षता बदकामध्ये नागरिकांचा सहभाग करून घेतला पाहिजे. संपूर्ण पुणेकरांनी सर्व बार पब 2-3 दिवस बंद केले पाहिजे. नियमावली तयार केली पाहिजे. नियमावलीची अंमलबजावणी केली पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *