google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पुरस्कार वितरण सोहळा नाशिकमध्ये

author
0 minutes, 0 seconds Read

अ. भा. नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या वतीने देण्यात येणारे नाट्यलेखन, रंगकर्मी, नाट्यकर्मी पुरस्कार मार्च महिन्यात जाहीर झाले. पुरस्कार वितरणाचा सोहळा गुरूवारी (दि. २७) सायं. ६ वा. महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाट्य परिषदेचे विश्वस्त व उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत, मनपा आयुक्त अशोक करंजकर, नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, उपाध्यक्ष नरेश गडेकर, भाऊसाहेब भोईर, समिती प्रमुख विजय चौघुले, कोषाध्यक्ष सतीश लोटके, सहकार्यवाह समीर इंदुलकर, सुनील ढगे, दिलीप कोरके उपस्थित राहणार आहेत.

जाहीर झालेले पुरस्कार :

  • प्रा. वसंत कानेटकर (रंगभूमी पुरस्कार): डॉ. जब्बार पटेल
  • वि. वा. शिरवाडकर (नाट्यलेखन पुरस्कार): अशोक हांडे
  • नटश्रेष्ठ बाबूराव सावंत (नाट्यकर्मी पुरस्कार): सदानंद जोशी

त्याचबरोबर १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त सांस्कृतिक नाट्यजागर अर्थात नाट्यकलेचा जागर कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवारी (दि. २६) सायं. ५ वा. होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून परिषदेचे विश्वस्त व उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री छगन भुजबळ, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. दरम्यान, दि. २६ व २७ जून या दोन दिवशी नाट्यकलेचा जागर कार्यक्रम महाकवी कालिदास कलामंदिरात रंगणार आहे. कार्यक्रमांना प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य असून, प्रवेशिका आवश्यक असणार आहे. प्रवेशिका वाटप करण्यास प्रारंभ झाला असून, स. ९ ते दु. १ तसेच सायं. ५ ते रात्री ८.३० या कालावधीत कालिदास कलामंदिर येथून प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *