google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

डाळींचे भाव कडाडले! आता दररोजच्या जेवणात आधार असलेले वरणही महागले…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक : दोन महिन्यांपासून तूरडाळ आणि चणाडाळीचे दर वाढतच आहेत. बाजारात चणाडाळ नव्वदीपार गेली असून, तूरडाळही १९० रुपयांपर्यंत पोहचली आहे. काही किरकोळ विक्रेत्यांकडे चणाडाळ शंभर तर तूरडाळ तब्बल १९५ ते २०० रुपयांनी विक्री केली जात आहे. त्यामुळे आगोदरच भाज्यांच्या दरवाढीने सर्वसामन्यांचे बजेट कोलमडलेले असतानाच आता दररोजच्या जेवणात आधार असलेले वरणही महागले आहे.

उन्हाळ्यामध्ये वाळवणाचे पदार्थ करण्यासाठी डाळींच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. अशातच गेल्यावर्षी पावसाने दडी दिल्याने यंदा आवकही कमी आहे. याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होत असून, डाळींच्या दरवाढीचा आलेख चढाच आहे. यातही प्रामुख्याने चणाडाळ आणि तूरडाळीचे दर प्रचंड वाढले आहेत. किरकोळ किराणा विक्रेत्यांकडे डाळींच्या प्रतवारीनुसार चणाडाळ ८५ ते ९० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. काही विक्रेत्यांकडे हेच दर १०० रुपयांपर्यंत आहे. तर तूरडाळही १७० ते २०० रुपये किलोपर्यंत विक्री होत आहे. बाजारपेठेत खाद्यतेलांचे दरही प्रतिलिटरमागे ५ ते ६ रुपयांनी वधारले आहेत. त्यामुळे आगोदरच दैनंदिन वापरातील जवळपास सर्व वस्तू महागल्याने समस्येच्या गर्तेत असलेल्या नाशिककरांना महागाईचा अधिक फटका बसत आहे.

उन्हाळ्यामध्ये वाळवणासाठी उडीद डाळीच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे दरही १३० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. मात्र, महिनाभरापासून उडीद डाळ स्वस्त झाली असून, दरही तुलनेने आवाक्यात आले आहेत. महिनाभरात उडीद डाळ प्रतिकिलो १५ रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *