google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मुंबई- नाशिक महामार्गावर कंटेनरने दुचाकीला धडक…

author
0 minutes, 0 seconds Read

मुंबई- नाशिक महामार्गावर कंटनेर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंटनेरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अनर्थ घडला. याप्रकरणी पोलिसांनी कंटनेर चालकाला अटक केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमान सय्यद (वय, १९) आणि अर्चना पगारे (वय, २०) अशी मृतांची नावे आहेत. अमान आणि अर्चना हे दोघेही ठाणे आणि डोंबिवलीमध्ये नोकरी करायचे. शनिवारी दोघेही कामावरून घरी परतत असताना खारेगाव टोल जवळ भरधाव कंटनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनरमधील लोखंडी रॉड त्यांच्या शरीरात घुसले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालक जितेंद्रकुमार यादव (वय, २८) याला अटक केली. तसेच हा अपघात कशामुळे झाला? त्यामागचे खरे कारणही शोधले जात आहे. याशिवाय, कंटेनर चालकाने मद्यपान केले होते का? याचाही तपास सुरू आहे.

पुणे- नाशिक महामार्गावर एका आमदाराच्या पुतण्याने दोन जणांना चिडरल्याची घटना उघडकीस आली. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातानंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *