google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथे पावसाचा जोर वाढणार 

author
0 minutes, 0 seconds Read

राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मॉन्सूनने बहुतांश जिल्ह्यात हजरे लावली आहे. रविवारी मुंबईत आणि पुण्यात व विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने आजपासून पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र व कोकणाच्या उर्वरीत भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील विजांच्या कडकाडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आल आहे. मुंबईत पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. तर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज नैऋत्य मौसमी वारे २४ जून रोजी अरबी समुद्र, गुजरातचा आणखी काही भाग महाराष्ट्राचा उर्वरित भाग, मध्य प्रदेश व छत्तीसगढचा आणखी काही भाग, ओडिसा उर्वरित भाग आणि झारखंडच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. त्याची उत्तरी सीमा अरबी समुद्राच्या २०.५ उत्तर अक्षांश वेळावर, रजपिपला, उज्जैन, विदिशा सिद्धी, चैबासा, भकुर, साहेब गंज आणि रेक्ससोल वरून जात आहे. त्याची पुढील तीन ते चार दिवसात उत्तरी अरबी समुद्र गुजरात व मध्यप्रदेशचा आणखी काही भाग छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग तसेच उत्तर प्रदेश उत्तराखंडचा काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. समुद्र सपाटीवरील द्रोनीका रेषा आज महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी लगत आहे. तसेच वातावरणाच्या मधल्या थरात दक्षिण छत्तीसगड ते दक्षिण महाराष्ट्र पर्यंत एक द्रोणीय रेषा जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *