google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

सर्व आमदारांना पाडण्याचा सकल मराठा समाजाचा निर्धार

author
0 minutes, 0 seconds Read

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सातत्याने गरळ ओकणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व आमदारांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा विडा सकल मराठा समाजाने उचलला असून या संदर्भात विशेष रणनीती आखण्याचे तसेच सूक्ष्म नियोजनाचे काम सुरू झाल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तुषार जगताप यांनी दिली.
मराठा समाजास संवैधानिक मार्गाने आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर राज्य सरकारातील अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ गरळ ओकू लागले. ओबीसीचा मुद्दा पुढे करून मराठा आंदोलनाला ते कडाडून विरोध करू लागले. ते येथेच थांबले नाहीत तर जरांगेचे चारित्र्यहनन करून त्यांच्यावर खालच्या पातळीवर टिकाटिप्पणीही सुरु केली. संवैधानिक पदावर बसलेल्या मंत्र्याच्या तोंडी अशी भाषा म्हणजे एक प्रकारे तो संविधानाचा अपमानच म्हणावा लागेल. मराठा समाजास डिचवण्यासाठी ओबीसी समाजास भडकवून भुजबळ यांनी प्रति आंदोलन व मोर्चे उभे करून त्याला आर्थिक रसदही पुरवली. आता तर ओबीसी कार्यकर्त्यांना उपोषणास बसवून मोठी नाट्यमय घडामोडी घडवून आणत स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर देत राष्ट्रवादी अजित पवार गटाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

लवकरच एकत्रित बैठकीच आयोजन करण्यात येणार आहे तसे त्या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मनोज जरांगे पाटीलही या नियोजनात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. जरांगे पाटील लवकरच नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत त्याची आठवणही जगताप यांनी करून दिली. जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी समन्वयक विलास पांगारकर, तुषार जगताप, सचिन पवार, विलास जाधव, सचिन शिंदे कार्यकर्ते, पदाधिकारी हजर होते.

डाव हाणून पाडला जाईल
मराठा,वंजारी,धनगर,माळी एससी,एसटी व अन्य ओबीसी कधीच एकमेकांच्या विरोधात नव्हते आणि भविष्यातही ते विरोधात राहणार नाहीत. नाशिक जिल्ह्यात सर्व समाज सतत एकोप्याने गुण्यागोविंदाने नांदतील यात कोणतीही शंका नाही. यात दरी निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न केला तरी त्यांचा तो डाव हाणून पाडला जाईल तीळ मात्र शंका नाही
तुषार जगताप
मा. संचालक – अण्णासाहेब पाटील महामंडळ

षड्यंत्राला कुणीही बळी पडू नये
जरांगे पाटील यांची प्रकृती उत्तम आहे.त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजन सुरु आहे. कुणीही कोणत्याही समाजच्या विरोधात पोस्ट,मॅसेज करून तेढ निर्माण करू नये.आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही नेते हेतूता दोन समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा या षड्यंत्राला कुणीही बळी पडू नये
विलास पांगारकर
समन्वयक – मराठा क्रांतो मोर्चा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *