google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक आपलं करिअर निवडावं:- आ. सत्यजित तांबे यांचं प्रतिपादन

author
0 minutes, 0 seconds Read

आपला महाराष्ट्र वृत्त :- दहावी, बारावी हे दोन वर्षे हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात. यावरच विद्यार्थ्यांच्या पुढील करिअर ची दिशा ठरत असते म्हणूनच जीवाची बाजी लावत वर्षभर विद्यार्थी अभ्यास करून या परीक्षेत प्राविण्य मिळवतात. अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च- एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी च्या परीक्षेत उतुंग भरारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज मराठा विद्या प्रसारक समाजाच्या नाशिक शहरातील गंगापूर रोड लगत असलेल्या के.टी.एच.एम महाविद्यालयातील व्ही.एल.सी. सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाअध्यक्ष श्री. चंद्रकांत बनकर साहेब यांनी केले व या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजित तांबे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता मा. जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.सत्यजित तांबे म्हणाले की, राज्यात नवलैकीक असलेली मराठा विद्या प्रसारक सारखी शैक्षणिक संस्था नितीन ठाकरे यशस्वीपणे हाताळताय. जगातील श्रीमंतांपैकी कुणीही आरक्षणातून पुढे गेलेल नाही. ते स्वतःच्या जिद्दिवर पुढे गेले आहेत. तेव्हा आताच्या मुलांनी आरक्षणाच्या भरवशावर न राहता स्वतःच्या जिद्दीनं पुढे जावं मुलांनी विचारपूर्वक आपल करिअर निवडावे तसेच पालकांनी मुलांना तू याच साईडला प्रवेश घे अशा प्रकारचा दबाव टाकू नये असे आ. तांबेंनी सांगितलं. या गुणगौरव सोहळ्यास कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवसेना उपनेते सुनील बागुल,हे होते, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍड,नितीन ठाकरे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे , अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रमोद जाधव, के के वाघ एग्रीकल्चर महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत देशमुख, कालिका मंदिरचे अध्यक्ष श्री. केशवअण्णा पाटील ,रमेशकाका भोसले, यांसह नाशिक जिल्ह्यातील दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर वडजे अविनाश वाळुंजे यांनी तर उपस्थितांचे आभार राजेंद्र शेळके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नाना बच्छाव , योगेश नाटकर पाटील ,व्यंकटेश मोरे,अमोल निकम, संजय फडोळ,स्वातीताई जाधव, शोभाताई सोनवणे,अनिल आहेर,राजाभाऊ जाधव, अशोक कदम. दीपक पाटील , मनिषा काटे ,प्रल्हाद जाधव, गौरव गाजरे, विलास गडाख ,रमेश खापरे , हिरामननाना वाघ,विकास रसाळ,सचिन पवार, सागर कातड,अनिल गायकवाड,महेंद्र बेहरे,रोहिणी उखाडे, यांनी अथक परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *