google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

काश्मीरमध्ये ‘महाराष्ट्र सदन’ उभारण्यासाठी अडीच एकर जागेसाठी राज्य सरकारने मोजले तब्बल ९ कोटी ३० लाख रुपये!

author
0 minutes, 2 seconds Read

महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवार, दि. २१ जून रोजी दिली.

या संदर्भात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चव्हाण म्हणाले की, जम्मू आणि काश्मिर सरकारने बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम तालुक्यातील २.५० एकर (२० कॅनल) जमीन महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केलेली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-कशिमर सरकार यांच्यावतीने पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्याच्यादृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आता या भूखंडावर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कशा स्वरूपाचे असावे आणि त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील, याबाबत नियोजन आणि आराखड्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल आणि लवकरच कश्मिरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहिल, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

https://www.mahamtb.com/Encyc/2024/6/21/Kashmir-Maharashtra-Sadan.html

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *