google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

विधानसभेसाठी भाजपची रणनिती ठरली,उत्तररात्रीपर्यंत रंगली बैठक

author
0 minutes, 0 seconds Read

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले असतानाच भाजपच्या गोटात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. मुंबईत शुक्रवारी संध्याकाळी ओबीसी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बहुचर्चित बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील प्रदेश भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला पोहोचले. ही बैठक तब्बल पाच तास सुरु होती. रात्री आठ वाजता सुरु झालेली ही बैठक उत्तररात्री एक वाजेपर्यंत रंगली. या बैठकीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.

विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा

भाजप कोअर कमिटीच्या या बैठकीत पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीसाठी कोअर कमिटीकडून 10 नावं निश्चित करुन ती यादी दिल्लीत केंद्रीय नेतृ्त्त्वाकडे पाठवली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील फायद्याच गणित लक्षात घेऊन विधानपरिषदेसाठी उमेदवार निश्चित केले जातील. संबंधित उमेदवाराचा विधानसभा क्षेत्रात किती प्रभाव आहे किंवा त्याला संधी दिल्यास विधानसभा निवडणुकीत जातीय आणि राजकीय समीकरणे कशाप्रकारे साधली जातील, हे मुद्दे विचारात घेण्यात आले आहेत. या सगळ्याची साधकबाधक चर्चा करुन भाजप कोअर कमिटीकडून विधानपरिषद निवडणुकीसाठीची 10 उमेदवारांची नावे दिल्लीत पाठवली जातील, असे सांगितले जाते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *