google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

भुजबळांनी कोणाला काय काय त्रास दिला- कल्याणराव पाटील

author
0 minutes, 0 seconds Read

लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर राज्यसभेत डावलले गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. नाराज असलेले छगन भुजबळ हे शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र, मंत्री भुजबळांनाच त्यांचा मतदारसंघ असलेल्या येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) कडून विरोध होत आहे. निफाड तालुक्यातील 46 गावातील पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवत भुजबळ यांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली आहे. त्यासाठी बैठकसुद्धा बोलवली आहे.

46 गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक

मंत्री छगन भुजबळांना शिवसेना (उद्धव ठाकरे गटात) पक्षात प्रवेश देऊ नये यासाठी लासलगाव येथे बैठक बोलवली आहे. निफाड तालुक्यातील 46 गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लासलगाव येथे ही बैठक बोलवली. या बैठकीतील भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

भुजबळांनी कोणाला काय काय त्रास दिला- कल्याणराव पाटील

माजी आमदार कल्याणराव पाटील म्हणाले की, सध्या भुजबळ शिवसेना उबाठामध्ये येतील ही चर्चा सुरू आहे. ही चर्चा ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहे. भुजबळांना प्रवेशापासून रोखण्यासाठी बैठक बोलवली. त्या बैठकीत भुजबळांना सेनेत घेतल्यास त्याचा चांगला परिणाम होण्याऐवजी वाईट परिणाम होईल, अशा भावना व्यक्त केल्या गेल्या. भुजबळ यांच्यामुळे आपल्या जवळ आलेले लोक हे दूर जातील. भुजबळांमुळेच मराठा ओबीसी वाद मतदारसंघासह राज्यात तयार झाला. भुजबळांना पक्षात घेऊ नये, अशी इच्छा व मागणी असून म्हणून 46 गावांची बैठक बोलवली. भुजबळांनी काय काय त्रास दिला आहे, हे आम्हा सर्वांना माहिती आहे. या बैठकीतून ही मागणी पक्षश्रेष्ठींकडे एका ठरावातून करणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *