google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक हळहळलं! ९ वर्षीय मुलीचा मृत्यू, धक्क्याने आईनेही सोडला जीव

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिन्यात कुटूंबातील ४ सदस्यांचा मृत्यू झाल्यास एक हसते खेळते कुटूंब संपले आहे. ९  वर्षीय मुलीचा अजारपणामुळे मृत्यू झाला. याचा आईला मोठा धक्का बसला व तिच्या तेराव्याला तिनेही जीव सोडला. या दोघींच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप-लेकावरही काळाने घाला घातला. राहत्या घरात बाप-लेकाचा मृतदेह आढळून आल्याने हे चौकोनी कुटूंब संपले आहे. या घटनेने नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
हे कुटूंब पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर येथे रहात होतं. महाजन कुटुंब काळाच्या पडड्याआड गेलं आहे. सुखी कुटुंबाच्या या करुण अंतामुळे प्रत्येकाकडून हळहळ व्यक्त केले जाते. 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *