google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं : पंकजा मुंडे

author
0 minutes, 2 seconds Read

लोकसभा निवडणुकीत भाजपाला अनेक मतदारसंघांमध्ये धक्कादायक निकालांचा सामना करावा लागला आहे. बीडमधील पंकजा मुंडे यांचा पराभवही भाजपासह त्यांच्या समर्थकांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी 7 हजार मतांनी पंकडा मुंडेंचा पराभव केला. हा पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील ऊसतोड कामगाराने आत्महत्या केली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत समर्थकांना आवाहन केलं आहे. मी पराभव स्विकारला आणि पचवला असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे. 

माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. आई बापाला दुःख देऊ नका. त्यांच्या जीवाला घोर लावू नका. तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ आहे असं आवाहन पंकजा मुंडे यांनी पोस्टमधून केलं आहे. यावेळी त्यांनी मी 15 जूनपासून आभार दौरा करत आहे. तोपर्यंत सर्वजण प्रतिक्षा करा अशी घोषणाही त्यांनी केली आहे. 

लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं, या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे

“स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे, संयम ठेवत आहे. तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे किती कठीण आहे माझ्यासाठी हे कळतंय का? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव, तुम्हीही पचवा!! अंधारी रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो. तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा,” अशी विनंती पंकजा मुंडे यांनी केली आहे. 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *