google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले….

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- आज स्वराज्य प्रेरिका, राजमाता राष्ट्रमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनास्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ.शोभाताई सोनवणे तसेच शहर अध्यक्ष सौ.स्वातीताई जाधव उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख नाना बच्छाव युवक सरचिटणीस योगेश नाटकर पा.कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके मा.रमेश खापरे आजच्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन युवक संघटक गौरव गाजरे यांनी केले

कार्यक्रमाची सुरुवात माँसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी माँसाहेबांच्या योगदानाचे वर्णन केले आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, माँसाहेबांनी त्यांच्या समर्पणाने आणि सेवाभावी वृत्तीने समाजाला नवा दिशा दिली आणि अनेकांना प्रेरणा दिली.


शिव व्यांयाखाते गौरव गाजरे यानी त्यांच्या भाषणात माँसाहेबांच्या समाजासाठी केलेल्या योगदानाची महती सांगितली. त्यांनी सांगितले की, माँसाहेबांच्या विचारांनी आणि कार्याने समाजात एक नवा अध्याय घडवला. त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या कार्याने आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

उपस्थितांनी माँसाहेबांच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमा साठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी अनिल आहेर, आण्णा पिंपळे ,अविनाश वाळुंजे,महेंद्र बेहेरे,शेतकरी नेते धनंजय काकडे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद लभडे, विकी गायधनी,नन्नावरे साहेब वकील अनिल गायकवाड ज्ञानेश्वर सुरासे आदी मान्यवर उपस्तीत होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *