google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मनोज जरांगे यांच्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ हा सिनेमा ; दोन दिवसांत सिनेमाची कमाई

author
0 minutes, 0 seconds Read

मनोज जरांगे यांच्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ हा सिनेमा सध्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेता रोहन पाटील हा मनोज जरांगे यांच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान 14 जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण या दोन दिवसांत काही लाखांचाच गल्ला हा सिनेमा जमवू शकलाय. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडत आहे.

सुरुवातीला हा सिनेमा 21 जून रोजी प्रदर्शित होणार होता पण नंतर त्याची प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आणि हा सिनेमा 14 जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर हा सिनेमा आधारित आहे. तसेच या सिनेमात अॅड.गुणरत्न सदावर्ते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या देखील भूमिका आहेत.

दोन दिवसांत सिनेमाची कमाई किती?
सुरुवाती पासूनच या सिनेमाची जोरदार चर्चा होती. पण या सिनेमाची कमाई मात्र तितकी झाली नसल्याचं चित्र सध्या बॉक्स ऑफिसवर आहे. सॅनसिल्कच्या अहवालानुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी नऊ लाखांच्या जवळपास कमाई केली. दुसऱ्याही दिवशी सिनेमाची कमाई ही 8 ते 9 लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे सिनेमाची एकूण कमाई ही 20 लाखांच्या आसपास गेल्याचं पाहायला मिळतंय.

मनोज जरांगेंच्या भूमिकेत रोहन पाटील
या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *