google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळयात राहणार उपस्थित 

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान येत्या गुरूवारी, म्हणजेच 20 जूनला होणार आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटूंब उपस्थित राहतील. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरेही पालखी सोहळ्याला उपस्थिती दर्शवतील. पालखीची पूजा करून काही वेळ ते वारीत सहभागी होतील.

राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर
येत्या गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजेच 19, 20 जूनला दोन दिवस राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतील. हा पूर्णत: धार्मिक दौरा असेल. 20 जूनला निवृत्तीनाथ महाराजाची पालखी पंढरीच्या दिशेनं रवाना होणार आहे, या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा असेल. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्याना राज ठाकरे भेट देतील आणि वारकऱ्यांशी संवाद साधतील. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन नंतर ते निवृत्तीनाथ समाधी मंदिराचं दर्शन घेतील.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *