google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या अस्ती नाशिक येथील रामकुंडामध्ये विसर्जित

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये निधन झाले होते . बुधवारी वांद्रे येथील सांताक्रूझ हिंदू स्मशानभूमीत सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनतर आज अमोल काळे यांच्या अस्ती विसर्जन करण्यासाठी अमोल काळे यांच्या परिवारासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक मध्ये आले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या गेट वे थांबले होते. त्यानंतर त्यांनी काळे कुटुंबासोबत रामकुंड येथे येऊन अमोल काळे यांच्या अस्ती चे विसर्जन केले. अमोल काळे हे मूळचे नागपुरातील असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमोल काळे हे बालपणीचे मित्र होते. २०१४ मध्ये महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून कालीन कडे पाहिले जात होत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *