google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मोठी बातमी : पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द…

author
0 minutes, 0 seconds Read

राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांची मालिका सुरुच आहे. त्यात अनेकांच्या प्रिय व्यक्तींना गमविण्याची वेळ आली आहे. बड्या धेंडांना वाचविण्यासाठी प्रशासनाची तत्परता पण दिसून आली आहे. देशभरातून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत असल्याने अखेर राज्याच्या सांस्कृतिक राजधानी, पुण्यात पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तळीरामांची तंद्री उडणार आहे. या शहरात दारु पिऊन वाहन चालविता येणार नाही. काय आहे हा निर्णय, त्यात काय होणार कारवाई जाणून घेऊयात…

पुण्यात इतके गुन्हे दाखल

पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. पुण्यात गेल्या ६ महिन्यात १६८४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जात होती.

आता थेट परवानाच रद्द

मात्र यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिने रद्द केले जाईल, त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर ६ महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार मात्र तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *