google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक जिल्ह्यात चिंतेचे ढग कायम; जून मध्ये असमाधानकारक पाऊस…!

author
0 minutes, 0 seconds Read

हवामान विभागाकडून मागील दोन दिवसात मुसळधार पावसाचा दिलेला अंदाज मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी खरा ठरला असला, तरी नाशिक जिल्ह्यात मात्र वरुणराजा रुसला असल्याचे चित्र आहे. जूनमध्ये साधारण १४४ मि.मी. पावसाची सामान्य स्थिती हवी होती; मात्र या अपेक्षा फोल ठरल्या. ९ जुलै अखेर जिल्ह्यात केवळ ८२.७ टक्केच पाऊस झाला आहे. ९३३.८ टक्के पाऊस सप्टेंबर अखेर अपेक्षीत असतो. त्यामुळे अजून मोठा पल्ला पावसाला गाठायचा आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना नाशिकमध्ये मात्र अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस बरसलेला नाही. पावसाने ओढ दिलेली असून मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गंगापूर धरणातील खालावलेली पाणीपातळी चिंतेचा विषय आहे. यंदा पारा चाळीशीपार पोहोचलेला असताना नागरिकांना पावसाची ओढ लागलेली होती. अशात पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी मे महिन्यात वळिवाच्या पावसाने शहर परिसरात हजेरी लावली होती. यामुळे काही प्रमाणात पारा घसरला; परंतु ऐन जून महिन्यात आपेक्षेप्रमाणं पाऊस झाला नाही. तसेच जुलै महिन्याचा पहिला आठवड्यात देखील समाधान कारक पाऊस न झाल्याने नाशिकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *