google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

असा शब्द वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय

author
0 minutes, 0 seconds Read

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, त्यानंतर मनसेचे फायरब्रॅण्ड नेते, पुढे वंचित बहुनजन आघाडीतून खासदारकी लढवणारे वसंत मोरे पुन्हा शिवसेनेत परतले आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी संजय राऊत आणि शिवसेना नेते आणि पुण्याहून आलेले वसंत मोरे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसंत मोरे आता खूप पुढे आले आहेत. ते मातोश्री पर्यंत पोहचले आहेत. त्यांना आहेत तिथेच थांबवू. तात्या लोकसभा निवडणूक लढले. मातोश्री हे त्यांचे शेवटचं डेस्टिनेशन आहे. ते जुने शिवसैनिक आहेत, असे यावेळी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद दिले आहेत. ते शिवसेनेत आल्यामुळे पुणे खडकावसला येथे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आपण सर्वांनी मिळून पुण्यातली  शिवासेना पुढे नेऊया, असे आवाहन त्यांनी केले. 

25 नगरसेवक निवडून आणणार 

बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन वसंत मोरेनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 1992 मध्ये शिवसेनेत सामील झालो. वयाच्या 31 व्या वर्षापर्यंत विभाग प्रमुख झालो. नंतर मनसेत गेलो. आता शिवसेनेत आलोय. पुणे शहरात भविष्यात किमान 25 नगरसेवक निवडून आणणार असा शब्द वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंना दिला. मनसे पदाधिकारी माझ्या सोबत आल्याचे वसंत मोरे म्हणाले. 

 तुम्हाला शिक्षा मिळणार

वसंतराव तुमचे आणि तुमच्या सहकाऱ्यांचे स्वगृही स्वागत आहे. मधल्या काळात शिवसेना पक्षाबहेर काय मिळते तो अनुभव त्यांनी घेतला. तुम्हाला शिक्षा मिळणार. ती शिक्षा म्हणजे पूर्वीपेक्षा जास्त शिवसेना पुण्यात वाढली पाहिजे. ही शिक्षा नव्हे तर जबाबदारी आहे. जबाबदारी समजून कामे करा, असे आवाहन त्यांनी केले.

आता मी पुण्याला शिवासैनिकांच्या मेळाव्याला येऊन सगळ्यांच्या भेटी घेणार असल्याचे ठाकरे म्हणाले. सर्वांना शिवसेनेत सामावून घेताना आनंद होतोय. तो जो एक काळ होता पुण्यात 5 आमदार होते ते काम करायचंय, असे ठाकरे वसंत मोरेंना म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *