google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिकमध्ये भाभानगर चौफुलीवर कारमध्ये तीन बॅगांमध्ये १९ किलो ३७ ग्रॅम गांजा सापडला…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक – नाशिकमध्ये भाभानगर चौफुलीवर कारमध्ये तीन बॅगांमध्ये १९ किलो ३७ ग्रॅम गांजा सापडला. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक किरण गोविंद धुमाळ (३१,रा.पुणे) यास मुद्देमालासह अटक केली आहे. मुंबई नाका गुन्हे शोध पथक, यांनी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयित ऑनलाइन कार सर्व्हिसेस अंतर्गत चालणाऱ्या एका संशयास्पद कारची झडती घेतली. या कारमधून (एमएच१२ डब्ल्यू आर ५२६२) तीन बॅगांमध्ये १९ किलो ३७ ग्रॅम गांजा हे अमली पदार्थ मिळून आले.

ज्या महिला व पुरूष प्रवाशाला घेऊन तो नाशिकमध्ये आले होते, ते दोघेही फरार झाले आहेत, त्यांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक गिरी यांनी सांगितले. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. मुंबई नाका पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *