google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मुंबईत लोकल पकडण्याच्या नादात महिला रुळावर पडली;आले कायमचे अपंगत्व

author
0 minutes, 0 seconds Read

मुंबईत रविवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज देखील मुंबईत सकाळपासून पाऊस सुरू आहे. पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली आहे. सकाळपासूंन रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली आहे. ज्या गाड्या सुरू आहेत त्यांना मोठी गर्दी आहे. या गर्दीमुळे पनवेल सीबीडी स्थानकादरम्यान, एक महिला लोकल पकडण्याच्या नादात पाय घसरून रुळावर पडल्याने तिच्या पायावरून लोकल गेल्याने दोन्ही पाय कापले गेले. या महिलेचा जीव वाचला असला तरी तिला कायमचे अपंगत्व आले आहे.
मुंबईत रात्रपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुले अनेक लोकल गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळ पासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने ठप्प झाल्या आहेत. पश्चिम रेल्वे देखील उशिराने धावत आहे.

या गर्दीतून एक महिलेने पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान पकडली. बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना या गाडीतून तिचा पाय घसरल्याने महिलेला ही रुळावर पडली. यावेळी या महिलेच्या अंगावरून रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. या अपघातामुळे मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, स्थानकावरील रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने गाडी मागे घेऊन महिलेला दवाखान्यात भरती केले. या महिलेचे नाव समजू शकले नाही. या महिलेचा जीव वाचला असला तरी तिचे दोन्ही पाय या अपघातात कापले गेल्याने टी अपंग झाली आहे.

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे लोकलसेवा ठप्प झाल्याने प्रवासशांची तारांबळ उडाली आहे. स्थानकावर मोठी गर्दी उसळली आहे. कार्यालयात पोहोचण्यासाठी नागरिक धावपळ करत होते. बेलापूरवरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे रेल्वे पकडण्यासाठी मोठी गर्दी प्रवाशांनी स्थानकावर केली आहे. या धावपळीतच महिला लोकलमधून खाली रुळावर पडून गंभीर जखमी झाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *