google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

 मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस…

author
0 minutes, 0 seconds Read

मुंबई; केरळ ते कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे कोकण अन् घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे. गेल्या २४ तासांत माथेरानमध्ये २२० मि.मी. पाऊस झाल्याने हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद तेथे झाली आहे.

विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी आहे. दरम्यान, गोव्यात शिवलिंग धबधब्यावर फिरायला आलेल्या १५० पर्यटकांसह स्थानिकांना वाचविण्यात आले.

समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यात माथेरानमध्ये २२० मि.मी. तर रत्नागिरी, राजापूर, पनवेल, फोंडा, कर्जतमध्ये १५० ते १२० मि.मी. पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावर गगनबावडा १७९, तर लोणावळामध्ये १३१ मि.मी. पावसाची नोंद गेल्या २४ तासांत झाली. मात्र उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार; तर बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. सोमवारी ८ जुलै रोजीही कोकण, घाटमाथा आणि विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *