google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

ज्येष्ठ पत्रकार,उत्कृष्ट पत्रकार आणि पत्रकारांचे गुणवंत पाल्य यांना शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान सोहळा संपन्न

author
0 minutes, 0 seconds Read

निफाड – निफाड येथे व्हाईस ऑफ इंडिया या पत्रकार संघटनेतर्फे ज्येष्ठ पत्रकार व उत्कृष्ट पत्रकार यांना पुरस्कार देऊन पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन निफाड येथील रुद्राय हॉटेलच्या बॅकवेट हॉलमध्ये व्हॉइस ऑफ इंडियाचे उपजिल्हाध्यक्ष देविदास बैरागी, सरचिटणीस देवानंद बैरागी, कार्याध्यक्ष सुधीर उमराळकर, महानगर अध्यक्ष इमरान शेख, शहर कार्याध्यक्ष मायकल खरात, निफाड तालुका अध्यक्ष महेश साळुंखे, तालुका उपाध्यक्ष योगेश कर्डीले व राजेश भडांगे, कार्याध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, सरचिटणीस रोहन सरोदे, सचिव बाबा गिते, सहसचिव राहुल कुलकर्णी, संपर्क प्रमुख सुनील क्षीरसागर, प्रसिद्ध प्रमुख जनार्दन चव्हाण आदींनी केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कुमार कडलग यांनी भूषविले तर सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक विलास ढोकरे, निफाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला निफाड तालुक्यातील पत्रकारांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

यावेळी निफाड तालुक्यातील पूर्व भागातील ज्येष्ठ पत्रकार डी.बी. कादरी यांनी उपस्थित पत्रकार बंधूंना मार्गदर्शन करत असताना पत्रकारांच्या सर्व व्यथा मांडल्या. त्या सोडवण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंनी एकत्र येणे गरजेचे आहे. ज्येष्ठ पत्रकार हरून शेख यांनी राज्य पातळीवरील सर्व पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पत्रकारांचे व्यथा शासनासमोर मांडणे गरजेचे आहे असे सांगितले.

या पत्रकार संघटनेने आज घेतलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी अभिनंदन केले आहे. आज पत्रकार आणि पत्रकार यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेला स्तुत्य उपक्रम पहिल्यांदाच राबविला गेला असल्याचे प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले. शासनाकडून सर्व स्तरातील नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत असतात परंतु पत्रकारांना कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही अशी खंत ज्येष्ठ पत्रकार बंधूंनी व्यक्त केली.

यावेळी व्हॉइस ऑफ इंडिया चे नाशिक जिल्हा अध्यक्ष देविदास बैरागी यांनी तालुक्यातील दोन आमदार प्रशासकीय उच्चस्त अधिकारी यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देऊनही उपस्थित न राहिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या अनुपस्थितीची दखल सर्व पत्रकार बंधूंनी निश्चित घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. उपस्थित सर्व दैनिकातील पत्रकार प्रामाणिकपणे तालुक्यामधील घडलेल्या सर्व घटनांचे वृत्तांकन प्रामाणिकपणे करत असतात. सर्व स्तरातील पदाधिकारी अधिकारी सर्वसामान्य नागरिक जनतेची दखल घेऊन वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून वृत्ताकन करणाऱ्या पत्रकारांच्या कार्यक्रमाला निमंत्रण देऊनही अनुपस्थित राहणे ही खेदाची बाब आहे असे उपस्थित सर्व पत्रकारांचे मत झाले आहे.


यावेळी ज्येष्ठ पत्रकार हारून शेख, बाळासाहेब वाघ, उत्कृष्ट पत्रकार दीपक घायाळ, आसिफ पठाण, माणिक देसाई, राजेंद्र पवार, किरणकुमार आवारे, बाजीराव कामानकर, दीपक श्रीवस्तव यांचे शाल, ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *