google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

शालेय अभ्यासक्रमात संविधान मूल्यांचा समावेश करावा; खा. भगरे यांना छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे निवेदन

author
0 minutes, 0 seconds Read

मागील ४० वर्षांपासून कार्यरत असणारी विज्ञान युगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना म्हणून ओळख असलेल्या छात्रभारती संघटनेच्या नाशिक जिल्हा कार्यकारणीच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खा. भास्कर भगरे यांचा पिंपळगाव बसवंत येथील निवासस्थानी भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधानाच्या मूल्यांचा देखील समावेश करावा या मागणीचे निवेदन खा. भगरे यांना देण्यात आले. यावेळी छात्रभारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष समाधान बागुल, नाशिक जिल्हाध्यक्ष रोहित वाघ, कार्यवाह स्वरूप पिसे, उपाध्यक्ष स्विटी गायकवाड, सचिव प्रेरणा पवार, आदित्य पवार, रोहित भडांगे, स्वाती साळवे व माजी जिल्हाध्यक्ष युवराज साळवे तसेच स्वप्निल कुंभारकर, स्पर्श शिराळ, अजिंक्य निकाळे, श्रेयस डेंगळे, विशाल पगारे, संकेत गवई, लुमान मणियार, अनुराग निमसे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *