google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मुंबईकरांनो रविवारी मध्य व हार्बरवर मेगाब्लॉक…

author
0 minutes, 3 seconds Read

मुंबईकरांना उद्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. देखभाल-दुरुस्ती आणि अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी 7 जुलै रोजी रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे.  पश्चिम रेल्वेवर मात्र मेगाब्लॉक नसणार आहे. त्यामुळं प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे. मेगाब्लॉकमुळं लोकल सेवांवर परिणाम होणार आहे. त्यामुळं मुंबईकरांनो लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराहाबेर पडा, असं अवाहन करण्यात येत आहे. 

मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरच मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवरुन धावणारी वसई रोड-दिवा लोकलला मेगाब्लॉकचा फटका बसणार आहे. सकाळी 9.50 ला सुटणारी वसई रोड-दिवा लोकल फक्त कोपरपर्यंतच धावेल. कोपर ते दिवा या स्थानकादरम्यान लोकल धावणार नाही. त्याचबरोबर दुपारी 11.45 आणि 2.45 वाजता दिवाहून वसईसाठी धावणारी लोकल कोपरहून सुटेल ही गाडी वसई येथे 12.30 पर्यंत व 3.25 पर्यंत पोहोचेल. तर, रत्नागिरी दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे स्थगित करण्यात येईल. 

मध्य रेल्वेवर कसा असेल मेगाब्लॉक?

ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.50 ते दुपारी 3.20पर्यंत असणार आहे. सकाळी ९:४६ दुपारी ०२:४२ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून डाउन जलद / निम जलद लोकल ठाणे ते कल्याणदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. १० मिनिटे उशिराने धावतील. अप जलद / निम जलद लोकल कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. त्या दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे

 कुर्ला ते वाशी या स्थानकांदरम्यान  मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत मेगाब्लॉकची वेळ असणार आहे. त्याकाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ पर्यंत पनवेल / बेलापूर / वाशीसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत पनवेल / बेलापूर / वाशीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *