google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

 नाशिकमध्ये भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून कार थेट गोदावरी नदीत कोसळली

author
0 minutes, 0 seconds Read

येथील गंगापूर धरण परिसरातील महादेवपूर गावाजवळील पुलावरुन जाणारी भरधाव कार नदीच्या पूलावरील कथडे तोडून थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली. या अपघातात चालक जागीच ठार झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात शुक्रवारी (दि. ५) गंगापूर राेडवरील हाॅटेल गंमत जंमतच्या पुढील नदीपात्राजवळ घडला. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन बापू कापडणीस (३५, रा. चांदशी) असे मृत कारचालकाचे नाव आहे. तर, किरण संजय कदम (३२), योगेश पानसरे (३४, दोघे रा. चांदशी) अशी कारमधील जखमींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नितीन कापडणीस हा त्याच्या कारमधून किरण व योगेश या दोघा मित्रांसमवेत दुगावकडून गंगापूर गावाच्या दिशेने येत होता. दुगावकडून गंगापूरकडे येताना हॉटेल गंमत-जंमतच्या अलिकडे गोदावरी नदीवर पुल आहे. तसेच पुलाकडे येताना उतारही आहे.

या उतारावरून कापडणीस यांची कार भरधाव वेगात येत असतानाच समोरून आलेल्या वाहनाच्या अप्पर डिप्परचा प्रखर लाईट कापडणीस याच्या डोळ्यावर आला. त्यामुळे काही क्षणात कापडणीस यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार काही कळायच्या पुलाचा कथडा तोडून नदीपात्रामध्ये पलटी झाली. नदीला पाणी नसल्याने कार खडकावर जाऊन आदळली. त्यात कापडणीस यांस गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. तर कारमधील दोघे किरण व योगेश हे जखमी झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी जखमींनी अपघाताची माहिती दिली. मयत कापडणीस यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय सूत्रांनी तपासून मृत घोषित केले. नाशिक तालुका पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *