google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

वंचितची साथ सोडून शिवबंधनात; वसंत मोरे ठाकरेसेनेत प्रवेश करणार; मुहूर्त ठरला

author
0 minutes, 0 seconds Read

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचितमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवणारे वसंत मोरे आता वंचितची साथही सोडणार असल्याचे समोर आले आहे. वसंत मोरे मनसे, वंचितनंतर आता उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ९जुलै रोजी त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्तही ठरला आहे. याची माहिती वसंत मोरे यांनीच दिली आहे.
वसंत मोरेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतरच ते ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर आता स्वत: वसंत मोरे यांनीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपण ठाकरे गटात प्रवेश कऱणार असल्याचे जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढवण्याची वसंत मोरे यांनी तयारी केली होती. यासाठी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली होती. मात्र महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. त्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांनी वंचितमध्ये प्रवेश करत त्यांच्याकडून लोकसभा लढवली होती.
मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. वसंत मोरे यांना खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *