google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

आवक घटल्याने मुंबईत टोमॅटोचे दरशतक

author
0 minutes, 0 seconds Read

आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळीने टोमॅटोची स्थानिक पातळीवरील आवक घटली आहे. याचा परिणाम मुंबईला रोज पाठविल्या जाणाऱ्या मालावर झाला आहे. यामुळे बाजारातील दर किलोला शंभरच्या आसपास आहेत. यंदा उन्हाचा पारा चाळिशीच्या वर राहिल्याने टोमॅटोच्या उत्पादनास त्याचा मोठा फटका बसला आहे.

यंदा या वाढत्या तापमानामुळे उन्हाळी लागवडीतील टोमॅटोच्या रोपांना फुटवे कमी प्रमाणात आले. ऊनपावसाच्या खेळाने करपा रोगाची लागण झाली. झाडांची उंची चांगली न वाढता रोपे खुरटी राहिली. याचा परिणाम उत्पादनावर होत यंदा मोठी घट झाली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १० ते १५ हजार जाळ्यांची (एक जाळी – २० किलो) आवक होत असते. सध्या हे प्रमाण तीन हजार जाळ्यांवर आले आहे. घाऊक बाजारात क्विंंटलला सरासरी चार हजार रुपये दर आहे. पावसामुळे मालाच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील आवक कमी झाल्याने काही व्यापारी संगमनेर परिसरातून किरकोळ विक्रीसाठी माल आणत आहेत. उन्हाळ्यात लागवड झालेला माल सध्या बाजारात येत आहे. नाशिकच्या बाजार समितीत सध्या टोमॅटोची ८० टक्के आवक कमी झाल्याचे सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *