google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

वारकरी सांप्रदयावर शोककळा, ह.भ.प. रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे वारीत हृदयविकाराच्या झटक्याने झालं निधन

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक: संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुख ह.भ.प रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे नगर येथे पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून नाशिक त्रंबकेश्वर ते पंढरपूर पायी पालखी सोहळ्यातील 27 नंबरचे दिंडीप्रमुख जेष्ठ कीर्तनकार ह भ प रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे निधन झाले आहे. बुधवारी पहाटे नगर (Ahmednagar) येथे पालखी सोहळ्यातच त्यांना तीव्र हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.

नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकार असलेले ह भ प रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या निधनाची बातमी नाशिक जिल्ह्यात पसरल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहेत. नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील जस्ट कीर्तनकार ह-भ-प रामनाथ महाराज शिलापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

रामनाथ महाराज शिरापूरकर हे नाशिक जिल्ह्यातील शिरपूर येथील रहिवाशी असून नाशिक जिल्ह्यातील नामसंकीर्तन सप्ताह सुरू करून जवळपास हजारो गाव खेड्यात ह भ प रामनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षानुवर्षे सप्ताह सुरू आहेत. त्यामुळे शिलापूरकर महाराज यांच्या निधनाच्या बातमीने नाशिक जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात 27 नंबरच्या पालखीचे रामनाथ महाराज शिलापूरकर हे दिंडी प्रमुख होते. गेल्या 20 वर्षांपासून ते श्रीनाथांच्या पालखीत हजारो वारकरी पायी सोहळ्यात घेऊन जाण्याची नियोजन करत होते. मात्र, आज पहाटे नगर येथे श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या प्रसंगी त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *