google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी गेलेल्या महिलांकडून पैसे उकळले जात असल्याचे अनेक प्रकार…

author
0 minutes, 0 seconds Read

महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. मात्र, या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी गेलेल्या महिलांची फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी आलेल्या महिलांकडे पैसे मागितल्यास किंवा कोणत्याही प्रकारची गडबड झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात योजनेच्या नोंदणीसाठी महिलांकडून तलाठीने लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी संबंधित तलाठीचे निलंबन करण्यात आले असून लवकरच त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल.
राजेश शेळके असे निलंबन झालेल्या तलाठीचे नाव आहे. लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आलेल्या महिलांकडून मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शेळकेविरोधात कारवाई करण्यात आली. शेळके यांच्याविरोधात अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम १९८ आणि ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना अटक केली जाईल. मोठी उमरी येथील तलाठी कार्यालयात योजनेसाठी नोंदणी सुरू होती. त्यावेळी शेळके यांनी महिलांकडून लाच घेतली, याचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *