google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

चितेगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता नववी उर्दू वर्गाला मान्यता.

author
0 minutes, 0 seconds Read

अमर अक्रम सय्यद यांच्या प्रयत्नांना यश

छत्रपती संभाजीनगरवृत्त :- पैठण तालुक्यातील चितेगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता उर्दू पहिली ते आठवी पर्यंत होती. परंतु चितेगावातील केंद्रीय प्राथमिक शाळेत उर्दू मुलींची संख्या जास्त असून सुद्धा नववी , दहावी वर्ग करीता मान्यता देण्यात येत नव्हती तरी जिल्हा परिषद छा संभाजीनगर येथे मागील चार वर्षापासून मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा करून सुद्धा मागणी पूर्ण करण्यात आलेली नव्हती ठराव अहवाल पूर्ण कागदपत्रे पैठण पंचायत समिती येथे पाठवलेले होते.आता प्रयन्त कोणत्याही अधिकाऱ्याने उर्दू वर्ग सुरु करण्या करीता दखल देण्यास तयारी दर्शवीत नाही.

पैठण तालुक्यातील सर्वात प्रथम उर्दू शाळा चितेगांव येथे सुरू करण्यात आली होती.तरी आतापर्यंत नववी व दहावी वर्गाला मान्यता देण्यात आली नव्हती शालेय सचिव अमर सय्यद यांनी वारंवार पाठपुरवा करीत होते पण अधिकारी फक्त आश्वासन देत होते. मी वारंवार कार्यालयचा भेटी देत होते. पण मोठ्या अशाने गेल्यावर वरिष्ठांकडून नेहमी निराशा होते हाती .

या कारणाने त्यांनी शेवटी २४ जून रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखीपत्र देऊन दि २९ जून रोजी आत्मदहनाचा निर्णय घेतला असता. याची वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेत दि २८ शुक्रवारी रोजी संध्यकाळी ८:०० वाजता बिड़कीन पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांचा हस्ते इयत्ता नववी उर्दू वर्गाला मान्यता देत आहे असे पत्र पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश लोखंडे यानी दिले. अमर सय्यद यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी संगितले.कि यात मोलाचा वाटा बिड़कीन पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील,माजी सरपंच वाहेद शेख, जावेद पठाण, कदीर, पठाण सय्यद अक्रम ,अहमद शेख, ,आबु काझी,हुसेन सय्यद ,अरुण देविदास, गणेश सोनवणे, इलियास शेख, उमर शेख, हबीब शेख यांना श्रेय दिले व छा संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी शाळांचा दौरा करुण विद्यार्थी व पालकांच्या समस्या जानून घेणार आहे असे सांगितले व अमर सय्यद यानी पत्रकार व सहकाऱ्यांचे आभार मानले

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *