google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशकात छात्रभारती संघटनेच्या वतीने ‘चला करिअर वर बोलू काही’ संवाद सोहळा संपन्न

author
0 minutes, 1 second Read

नाशिक वृत्त :- दहावी, बारावी हे दोन वर्षे हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात. यावरच विद्यार्थ्यांच्या पुढील करिअर ची दिशा ठरत असते म्हणूनच जीवाची बाजी लावत वर्षभर विद्यार्थी अभ्यास करून या परीक्षेत प्राविण्य मिळवतात. परंतु यापुढे आपण नेमकं काय करावं हा प्रश्न नेहमी या विद्यार्थ्यांसमोर असतो. या उद्देशान विज्ञान युगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना म्हणून ओळख असलेल्या छत्रभारती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च- एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी च्या परीक्षेत उतुंग भरारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला करिअर वर बोलू काही’ या संवाद सोहळ्याचं शनिवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या हुतात्मा स्मारकात आयोजन करण्यात आल होत. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते शैक्षणिक पुरोगामी संघटनेत कार्यरत असलेले डॉ. मिलिंद वाघ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रमुख पाहुणे डॉ. मिलिंद वाघ यांचं छात्रभारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष समाधान बागुल यांच्या हस्ते गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. वाघ म्हणाले की, आपण माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना आपली आवड काय आहे हे बघण महत्वाचं आहे. तसेच आपल्या आवडी बरोबरच आजच्या धावपळीच्या युगात समजाला काय गरज आहे. याचा अभ्यास करण महत्वाचं आहे.

आपण कोणती नोकरी ती बाहेर मार्केटशी निगडित असायला हवी याचाही विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा आस डॉ वाघ यांनी सांगितलं. या कार्यक्रमास छात्रभारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष समाधान बागुल, सह कार्यअध्यक्ष देविदास हजारे, छात्रभारती नाशिक जिल्हाध्यक्ष रोहित वाघ,माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव गणगे,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष स्वीटी गायकवाड,स्वरूप पिसे,आदित्य पवार , स्पर्श शिराळ , शुभम अहिर , रोहित भडांगे,स्वाती साळवे, अजिंक्य निकाळजे , सतीश कोल्हे, संकेत गवई, विशाल पगारे तसेच विघ्नेश कॉम्प्युटर्स च्या मंजिरी कुलकर्णी यांसह छात्रभारतीचे नाशिक जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *