मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला केंद्राचा ग्रीन सिग्नल | 30 नवीन स्थानकं | 1 हजार गावांना लाभ | 18 हजार कोटींचा निधी मंजूर

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ताज्या बैठकीत, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील सुमारे 1,000 गावांना थेट फायदा होणार आहे. मनमाड ते इंदूर या 309 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर 30 नवीन स्थानकांचे निर्माण होईल. उद्योगक्षेत्राला प्रोत्साहन हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट […]

आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर :  मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी  आज नागपूर येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात दिली. रेशीमबाग […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली

मुंबई :- जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले लोकाभिमुख नेतृत्व खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले नेतृत्व म्हणून खासदार चव्हाण यांची ओळख कायम राहील. नायगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, विधिमंडळातील […]

श्रावणी हंगामा रजनीत पाऊस गीतांची रिमझिम सायंकाळ; रसिक श्रोते मंत्रमुग्ध…

नाशिकरोड:- संविधान कराओके टीमवतीने आयोजित केलेल्या ‘श्रावणी हंगामा रजनी’ कार्यक्रमाने नाशिकरोडच्या रसिक श्रोतृवर्गाची मने जिंकली. या संगीतमय सायंकाळी एकाहून एक सरस हृदयस्पर्शी अजरामर गाण्यांनी वातावरणाला एक नव्या उंचीवर नेले. “बरसो रे मेघा”, “मेरे नैना सावन भादो”, “ओ सजना बरखा बहार आयी”, “रिमझिम गिरे सावन”, आणि “गारवा वाऱ्यावर भिरभीर” यांसारख्या अनेक गीतांनी श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. […]

शिर्डी येथे होणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य शिखर अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

मुंबई (प्रतिनिधी) : जगातल्या पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील पत्रकारांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांसाठी उभ्या केलेल्या संघटनेचा आम्हाला अभिमान वाटतो. ही संघटना केवळ देशपातळीवरच नव्हे, तर विदेशातही ४३ देशांत आपल्या कामाच्या माध्यमांतून सर्वाना परिचयाची झाली आहे. व्हॉईस ऑफ मिडीयाची पाच वर्षांतील वाटचाल देदीप्यमान आणि अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.येत्या […]

बिटको महाविद्यालयात विद्यार्थी सभा वतीने अवयव दान जनजागृती कार्यक्रम…..

नाशिकरोड :- ” डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली मोठी देणगी आहे. परंतु काही व्यक्ती त्यापासून वंचित असतात. अलीकडे दृष्टीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. अवयव दान, रक्तदान आणि नेत्रदानाला आज फार महत्व आहे. धनदान अन्नदान यापेक्षा जर नेत्रदान करून एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी दिली तर आयुष्यात आपल्याला कर्तबगारिने दाता खूप मोठा होईल व मोठे समाजकार्य […]

महिला पत्रकारावर अश्लील भाषा वापरणाऱ्या माजी नगराध्यक्षावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पोलीस आयुक्त यांना निवेदन नाशिक : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकारावर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत अश्लील भाषा वापरल्याने महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ, तसेच नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427