महायुती आणि महाविकास आघाडीची भव्य रॅली, उमेदवारांचा दमदार प्रचार सुरू

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बिगुलानंतर नाशिकमधील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज नाशिकच्या विविध मतदारसंघांमध्ये राजकीय उर्जा दिसून आली, जिथे रॅली, कार्यकर्त्यांचा जोश, आणि पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था लक्षवेधी ठरली. नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल भाजपच्या महायुतीकडून नाशिक मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे यांनी अशोक […]

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ५४ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा वळण रस्ता, येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर आणि सहकार नगर, लिंक रोड, चेंबूर, मुंबई या ठिकाणी परराज्यात निर्मित असलेला भांग मिश्रीत पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर 26 ऑक्टोबर रोजी कारवाई केली. यामध्ये चेंबूर येथील कारवाईत 5 व मुंब्रा येथील कारवाईमध्ये 2 […]

निवडणूक काळात मतदानोत्तर जनमत चाचणी जाहीर करण्यास मनाई…

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मतदानोत्तर जनमत चाचणी (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे मत सर्वेक्षण (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर […]

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने करण गायकर यांचे नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व मधून उमेदवारी अर्ज दाखल..

नाशिक :- आज मराठा समाजाचे नेते आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी छावा क्रांतिवीर सेनेच्या संस्थापक अध्यक्ष या नात्याने नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.हे पाऊल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून उचलण्यात आले असून, मराठा समाजाच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी एक नवा संकल्प घेऊन पुढे […]

दिनकर धर्मा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल; नाशिक पश्चिम मतदारसंघातून जोरदार शक्ती प्रदर्शन

नाशिक: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पश्चिम मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिनकर धर्मा पाटील यांनी आज भव्य शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला. युवकांसाठी रोजगार निर्मिती, महिलांचे सबलीकरण, कामगारांना पेन्शन, कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा, आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे यांसारख्या विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत पाटील यांनी जनतेची मते जिंकण्याचा निर्धार केला आहे. हजारो […]

नाशिक ‘मध्य’मध्ये थेट मुकाबला: फरांदे-विरुद्ध-गीते;

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीच्या देवयानी फरांदे आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार वसंत गिते यांच्यात थेट लढत रंगली आहे. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत नाव नसल्यामुळे देवयानी फरांदे यांनी मुंबई गाठून शक्तिप्रदर्शन केले होते. अखेर दुसऱ्या यादीत त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे […]

नाशिक ‘मध्य’ची जागा काँग्रेससाठी हवीच; काँग्रेसचा ठाकरे गटाच्या विरोधात ‘राजीनामा’ स्ट्राइक

नाशिकच्या ‘मध्य’ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता जागेच्या हक्कासाठी जोरदार आक्रमक झाले आहेत. खेळाच्या मैदानावर क्रिकेटप्रमाणेच राजकीय डावपेचांचा खेळ चालू असताना, काँग्रेसने आपल्या परंपरागत मतदारसंघावर दावा कायम राखण्याची मागणी जोरकसपणे मांडली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, नाशिक शहरातील तीन मतदारसंघांपैकी ‘नाशिक मध्य’ हा पारंपरिक काँग्रेसचा गड आहे. […]

नाशिकमध्ये अर्ज दाखल प्रक्रियेसाठी वाहतूक बदल, नियमभंग करणार्‍यांवर कारवाईचा इशारा

नाशिक शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार उद्या, 28 ऑक्टोबर आणि मंगळवारी, 29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नाशिक वाहतूक पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी या वाहतूक बदलांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. वाहतूक […]

भिवंडीत संशयित वाहनाची भरारी पथक व पोलिसांकडून तपासणी

ठाणे :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. १३६ भिवंडी पश्चिम येथे भरारी पथक व नारपोली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये रू. ३ लाख ३१ हजार ६०९/- चा मुद्देमाल विनातपशील आढळला असून ज्यात चांदी व चांदीचे काम असलेल्या वस्तूंची बिले तपासणीदरम्यान सादर न केल्याने भरारी पथकामार्फत धडक […]

गणेश गीते राष्ट्रवादीचे नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवार: विकासाचे वचन

राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणेश गीते यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गीते नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करणे, मूलभूत सुविधा पुरवणे आणि स्थानिक समस्यांवर ठोस उपाययोजना राबविण्याचे वचन गीते यांनी दिले आहे. समर्थकांना विकासाच्या दिशेने एकत्र येण्याचे आवाहन करत, गीते यांनी आपल्या उमेदवारीच्या […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427