बिटको महाविद्यालयात ‘ ओझोनचे संरक्षण आपले रक्षण ‘ या विषयावर सुजाता बाबर यांचे व्याख्यान….

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिकरोड :- ” पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फीअर मध्ये वायूचा एक नाजूक थर आहे. ज्यामध्ये ओझोन रेणूंचे प्रमाण तुलनेने जास्त असते आणि सूर्याच्या अतिनील किरणोत्सवर्गाच्या हानिकारक परिणामांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ज्यामुळे त्वचेचे असंख्य रोग होऊ शकतात. मोन्ट्रीयल प्रोटोकॉलमुळे रेफ्रिजरेटर, एअर कुलिंग सिस्टीम आणि इतर उत्पादनामधील करणारी रसायने एचएफसी टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात आली आहेत , ” असे मार्गदर्शन करताना खगोल मंडळ अभ्यासक व स्तंभ लेखिका सौ. सुजाता बाबर यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील कनिष्ठ बिटको महाविद्यालय भूगोल विभागवतीने आयोजित ‘ ओझोनचे संरक्षण तर आपले रक्षण ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनिता नेमाडे यासह पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, प्रा. रागिणी भवर, सुरेखा वसईकर, स्टाफ सेक्रेटरी राहुल पाटील, संतोष गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना उपप्राचार्या सुनीता नेमाडे यांनी आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिन..जीवन रक्षणासाठी ओझोन थराच्या महत्त्व बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. त्यासाठी ओझोन कमी करणाऱ्या पदार्थांशी संबंधित जोखीम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे त्यासाठी सनस्क्रीन वापरणे, संरक्षक कपडे परिधान करणे आणि जास्त सूर्यप्रकाश टाळणे याद्वारे अतिनील किरणांपासून संरक्षण करता येते असे सांगितले .
तंत्रसाह्य भूषण कोतकर यांनी केले. सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी तर परिचय व आभार प्रा. रागिनी भवर यांनी मानले. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कला व विज्ञान शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427