नाशिक :- नाशिक पोलिस आयुक्तालय व व नाशिक मनपा शिक्षण विभाग यांचें संयुक्तविद्यमाने नाशिक मनपा शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक , शासकीय , केंद्रीय विद्यालय या 23 शाळांमध्ये “स्टुडंट्स पोलिस कॅडेट् ” उपक्रम राबविण्यात येत आहे . हा उपक्रम देशभर राबवला जात आहे महाराष्ट्रातील सर्व शासकीय शाळांमध्ये राबवला जात असुन यातून विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनातच नीतिमूल्ये रुजावी व सुसंस्कृत नागरिक घडावे असा उद्देश आहे या उपक्रमाअंतर्गत छोटा पोलिस, महिला सुरक्षा उपाययोजना, वाहतूक नियमांची जनजागृती, पोलिस स्टेशन भेट व कामकाजाची माहिती, ट्रॅफिक पार्क भेट, स्वच्छता अभियान, धूम्रपान निर्मूलन अभियान, वृक्षारोपण सप्ताह, ट्रॅफिक सिन्नल माहिती व प्रत्यक्ष भेट देउन माहिती घेणे, पी टी सी अकॅडमीला भेट, वाहतूक सुरक्षा सप्ताह राबवणे, शालेय विद्यार्थ्याना नीतीमूल्यांची शिकवण, बाह्यउपक्रमात शारिरीक कवायत, खेळ, ड्रिल, विविध गुन्हे व शिक्षा यांची माहिती, टाकाऊ पासून टिकाऊ , प्लॅस्टिकचा पुनर्वापर असे अनेक उपक्रम राबविले जात आहे या उपक्रमाची प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा गौरव सन्मान सोहळा पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेला होता.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मा. श्री चंद्रकांत खांडवी , पोलीस उपयुक्त, मुख्यालय व वाहतूक नाशिक शहर मा. श्री बी. टी. पाटील मनपा शिक्षणाधिकारी साहेब , मा. श्री सुधाकर सुराडकर सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक विभाग, नाशिक शहर उपस्थीत होते. प्रमुख अतिथी नाशिक शहर पोलिस उपायुक्त मा.श्री चंद्रकांत खांडवी साहेब व मनपा शिक्षणाधिकारी मा. श्री बी टी पाटील साहेब यांचा सत्कार भगवत गीता ग्रंथ देउन करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचें शुभहस्ते नाशिक मनपा शिक्षण विभागातील एस पी सी उपक्रमात सहभागी शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा सन्मानपत्र व गुलाबपुष्प देउन सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक शहर पोलिस उपायुक्त श्री चंद्रकांत खांडवी साहेब यांनी मार्गदर्शन करताना या उपक्रमाची व्याप्ती अधिक वाढवावी एस पी सी उपक्रमातील सहभागी शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचें अभिनंदन केले यापुढे एस पी सी उपक्रमांची कार्यवाही सर्व शाळांमध्ये करणार असल्याची ग्वाही दिली तसेच शिक्षणाधिकारी श्री बी टी पाटील साहेब यांनी नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या वतीने मनपा शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक शाळामध्ये सुरू असलेल्या स्टुडंट्स पोलिस कॅडेट उपक्रमांचे कौतुक केले .
सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचें अभिनंदन करून जास्तीत विद्यार्थ्यापर्यंत हा उपक्रम शिक्षकांनी पोहचवावा तसेच उपक्रमांची अधिक माहिती देउन या उपक्रमाची प्रभावी कार्यवाही करणारे नाशिक. पोलिस हवालदार सचिन जाधव यांचे कौतुक केले. कार्यक्रमप्रसंगी पोलिस हवालदार सचिन जाधव यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला, सत्कारमूर्ती श्री सुरेश खांडबहाले व श्री अरुण दातीर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहा. पोलिस निरीक्षक कैलास भडांगे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस हवालदार सचिन जाधव यांनी केले आभार प्रदर्शन श्री सुरेश खांडबहाले यांनी मानले याप्रसंगी नाशिक मनपा शिक्षणं विभाग शाळा क्रमांक 1,3,4,20,21,27,28,72,73,86,86 मनपा माध्यमिक विद्यालय सातपूर कॉलनी, अंबड, पाथर्डी गाव, चूंचाळे गाव, म्हसरुळ, नांदुरगाव, शिवाजी नगर, बडी दर्गा, वडाळा गाव , कामटवाडे, रायगड चौक, शासकीय कन्या विद्यालय, केंद्रीय विद्यालय उपनगर, वडनेर गेट या शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला.